निपाणी येथे तरुणाचा खून.

 

 प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर -निपाणी येथील अशरफअल्ली शेरअल्ली नगारजी (वय 20.रा.जामदार प्लॉट,दुसरी गल्ली निपाणी) याचा बुधवार (दि.02) रोजी रात्री नऊच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे..या घटनेची नोंद निपाणी पोलिस ठाण्यात झाली आहे.

अधिल माहिती अशी की,यातील मयत अशरफअली हा आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करुन येत असताना निपाणी शहराच्या मध्यवर्ती भागातील विद्यानगर परिसरात दबा धरुन बसलेल्या काही जणांनी अंधाराचा फायदा घेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने त्याच्या हातावर एक आणि मानेवर दोन वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.या खूनाची माहिती निपाणी पोलिसांना समजताच घटना स्थळी सीपीआय बी.एस.तळवार ,उपनिरिक्षका उमादेवी यांच्यासह पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन जखमीला तेथील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढ़ील उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. या घटनेमुळे निपाणी शहरात घबराट पसरली आहे.

यातील हल्लेखोर हल्ला करून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post