प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- बेकायदेशीर रित्या हत्यारे विक्री करण्यासाठी आलेल्या शामराव सदाशिव चव्हाण (वय 44.रा कनाननगर ,शाहुपुरी ) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 16 हजार रुपये .किमंतीचे 61 धारदार कोयते आणि सुरे जप्त करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात सुरु असलेले अवैद्य व्यवसायासह दारु ,जुगार,शस्त्रे याची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना दिल्या होत्या.त्या अनुशंगाने माहिती घेत असताना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.दिलीप पवार यांना एक इसम बुधवार (दि.23) रोजी पापाची तिकटी येथे शस्त्रे विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली असता लक्ष्मीपुरी पोलिसांचे एक पथक त्या परिसरात पाठविले असता एक इसम संशयीतरित्या हातात प्लास्टिक पोते घेऊन निदर्शनास आले असता त्याला ताब्यात घेऊन पोत्याची झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे 16 हजार रुपये. किंमतीचे 61 धारदार कोयते आणि सुरे मिळुन आल्याने पोलिसांनी जप्त करून त्याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.दिलीप पवार यांच्यासह पोलिस प्रितम मिठारी ,गजानन परिट ,मंगेश माने,तानाजी दावणे ,किशोर पवार ,चालक अमित पाटील महिला पोलिस वृदा इनामदार आणि माधवी खाडे यांनी केली.