भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर-कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये, भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झालीय. त्यामध्ये मुलांनी हिरीरीनं सहभाग घेतला.  शिवानी पाटील आणि अर्चना प्रभावळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे राहुल पाटील आणि विकास राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अर्चना पाटील यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील कसे बनवायचे, याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील आणि दीपावलीसाठी लागणाऱ्या वस्तू बनवून घेतल्या. आकाशकंदील बनवताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय आहे. हस्तकलेच्या वस्तू बनवताना मुलांची एकाग्रता वाढीस लागते, असंही अर्चना पाटील यांनी सांगितलं. यावेळी मुख्याध्यापिका गीता काळे, मंदाकिनी पाटील, अरविंद मुरकुटे पाटील, वंदना भोपळे, कविता रावळ, वैशाली पाटील, दीपक कुंभार, काशिराम कोमटवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post