तरुणाचा खून नसून अंगावर वीज पडुन मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील  वारणानगर परिसरात असलेल्या फडणाई कॉलनी येथील  नितीन मानसिंग भोसले (वय 30) याचा मंगळवार (दि.01) रोजी सकाळी   नवे पारगाव येथे मोटारसायकलसह त्याचा मृतदेह आढ़ळुन आला होता.

दरम्यान सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.मयताचे शवविच्छेदन डॉ.श्रीमती गावडे यांनी केले असता मयताच्या अंगावर वीज पडुन मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले.तसेच मयताच्या अंगावर भाजल्याच्या आणि फुफ्फुस जळाल्याचं शवविच्छेदन केल्या नंतर स्पष्ट झाले.त्यामुळे नितीन भोसले याचा खून केला नसून त्याच्या अंगावर वीज पडुन नैसर्गिकरीत्या मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या मयताचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असता प्रथम दर्शनी त्याचा खून केल्याच्या शक्यतेने वडगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ,कोल्हापूर यांनी संयुक्तरित्या तपास करीत असताना काही संशयीताना ताब्यात ही घेण्यात आले होते. डॉक्टरांच्या अहवालाने पोलिसांचा जीव भाड्यांत पडला.

Post a Comment

Previous Post Next Post