तर्कतीर्थ व संविधान सन्मानवर प्रबोधिनीत व्याख्यानांचे आयोजन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने ' तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : जीवन व साहित्य ' या विषयावर ज्येष्ठ विचारवंत लेखक व समग्र तर्कतीर्थ साहित्याचे संपादक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे  तसेच ' संविधान सन्मान  संमेलनाचा अन्वयार्थ ' या विषयावर नामवंत इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ.टी. एस.पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.ही  व्याख्याने  अनुक्रमे बुधवार व गुरुवार ता. ९ व १० ऑक्टोबर २४ रोजी सायं. ६ वाजता समाजवादी प्रबोधिनी, राजर्षी शाहू पुतळ्याजवळ,इचलकरंजी येथे होणार आहेत.


 तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित, तर्कतीर्थ हे समीक्षक, लेखक, प्राच्यविद्यापंडि व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. तसेच भारतीय राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करून मोठे काम केले. त्यांच्या समग्र साहित्याचे अठरा खंडांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी 

संपादन करुन नुकतीच फार मोठी कामगिरी केली आहे. तसेच कोल्हापुरात नुकतेच संविधान सन्मान संमेलन संपन्न झाले. त्याच्या नियोजनात प्राचार्य डॉ.टी. एस.पाटील सहभागी होते. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी ते मंचावरही उपस्थित होते. या संमेलनाची विचारधारा पुढे घेऊन जाणे ही संविधानावर निष्ठा असलेल्यांचे कर्तव्य आहे.या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या व्याख्यानाला इचलकरंजी व परिसरातील जिज्ञासू बंधू भगिनींनी  उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post