इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त  महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रसाद काटकर आणि उपायुक्त स्मृती पाटील  यांच्या हस्ते आणि उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. तसेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करणेत येत असल्याने महानगरपालिकेच्या रविंद्रनाथ टागोर वाचनालय येथे डॉ.कलाम यांच्या जीवण चरित्राचे सामुदायिक वाचन करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करणेत आला.

         याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा.आयुक्त विजय कावळे, सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, समाज विकास अधिकारी विकास विरकर,अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, ग्रंथपाल बेबी नदाफ, सदाशिव शिंदे,प्रदीप झंबरी , अशोक कमते, सचिन शेडबाळे, आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


  

           

Post a Comment

Previous Post Next Post