प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : निवडणूक आयोगा कडून राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होवुन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर पालिकेच्या सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीमध्ये आयुक्त यांनी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागा कडील अत्यावश्यक कामांचा आढावा संबंधित विभाग प्रमुख यांचेकडून घेतला. या अनुषंगाने सर्व अत्यावश्यक कामे तातडीने मार्गी लावावीत असे सक्त आदेश सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दिलेले आहेत. तसेच जे विभाग प्रमुख मुदतीत कामे पूर्ण करणार नाहीत त्यांचेवर कडक कारवाई करणेचा इशारा दिला आहे.
या बैठकीस सहा आयुक्त विजय कावळे, सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत,शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले यांचेसह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.