२७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नुतन १२ मतदान केंद्रासह एकुण २६६ मतदान केंद्रे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

  हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत एकुण २५४ मतदान केंद्रे होती. तथापि लोकसभा निवडणुकीत राज्यात काही मतदान केंद्रावर मतदाना साठी झालेला विलंब आणि मतदानासाठी झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ज्या मतदान केंद्रामध्ये १३५० पेक्षा जास्त मतदार आहेत अशा मतदान केंद्राची फेररचना करणेच्या सूचना दिलेल्या आहेत.या सुचनेच्या अनुषंगाने २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राची फेररचना करणेत आलेली असुन यापुढे २५४ ऐवजी २६६ केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.

सदर मतदान केंद्राची फेररचना करताना कोणत्याही मतदान केंद्राची इमारत (LOCATION) बदलणेत आलेली नसुन नव्याने स्थापन करणेत आलेली मतदान केंद्रे त्याच इमारतीमध्ये स्थापन केलेली आहेत.

 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नव्याने स्थापन करणेत आलेली मतदान केंद्रे खालील प्रमाणे :-

१) केंद्र क्रमांक १०, कोरोची

कुमार विद्या मंदिर, लोकमान्य नगर, पुर्व पश्चिम इमारत, पुर्वेकडुन खोली क्रमांक १.


२) केंद्र क्रमांक २७, खोतवाडी,

  कुमार विद्या मंदिर, षटकोनी इमारत नंबर १, पुर्वेकडुन खोली क्रमांक १.


३) केंद्र क्रमांक ३४,कबनुर,

दत्त नगर, अंगणवाडी क्रमांक ११० ची इमारत.


४) केंद्र क्रमांक ६३, चंदुर,

  अंगणवाडी क्रमांक ९९ ची

   इमारत, चंदुर.


५) केंद्र क्रमांक १४५,

    इचलकरंजी 

    मयुर हायस्कूल पुर्वेकडुन

    खोली क्रमांक १.


६) केंद्र क्रमांक १४९,

   इचलकरंजी, कै.बाबुराव

   आवाडे विद्या मंदिर, शाळा 

    क्रमांक ५१, दक्षिण उत्तर 

    इमारत, पुर्वाभिमुख खोली

    क्रमांक १.


७) केंद्र क्रमांक १५६,

 ‌‌   इचलकरंजी, बालाजी विद्या

‌‌   मंदिर आणि ज्युनियर कॉलेज,

   पुर्व पश्चिम इमारत, दक्षिणा 

   भिमुख खोली क्रमांक ४


८) केंद्र क्रमांक २१० ,

    इचलकरंजी, लोकमान्य 

    टिळक विद्या मंदिर, शाळा 

    क्रमांक ८ दक्षिण उत्तर इमारत,

    पुर्वाभिमुख खोली क्रमांक १०.


९) केंद्र क्रमांक २२४,

    इचलकरंजी, व्यंकटराव 

    हायस्कूल, पश्चिमेकडील नवीन 

    इमारत,पुर्वाभिमुख ब्लॉक

    नंबर ११९.


१०) केंद्र क्रमांक २४५,

       इचलकरंजी, रा.छ. शाहु

       हायस्कूल कार्यालय खोली.


११) केंद्र क्रमांक २४८,

      इचलकरंजी, स्वामी 

      विवेकानंद मुलींचे हायस्कूल,

      पुर्व पश्चिम इमारत, खोली 

      क्रमांक ८.


१२) केंद्र क्रमांक २५१,

      इचलकरंजी, महात्मा गांधी 

      कन्या विद्या मंदिर, शाळा

      क्रमांक १८, खोली क्रमांक ४ 

       

     वरील प्रमाणे नव्याने मतदान केंद्राची स्थापना करणेत आलेली आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका तथा सहा. निवडणुक निर्णय अधिकारी, २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ प्रसाद काटकर यांचेकडून देणेत येत आहे.


   

Post a Comment

Previous Post Next Post