प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज गुरुवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी (राष्ट्रीय संकल्प दिवस) निमित्त तसेच स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.तसेच यावेळी राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त उपस्थितांच्या कडून राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेणेत आली.
याप्रसंगी माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, प्रदीप झमरी, उमाजी कणसे, अशोक कमते , सचिन व्हलेर आदी उपस्थित होते.