प्रबोधन वाचनालयात वाचन प्रेरणा दिनी ' ग्रंथ प्रदर्शन ' तसेच डॉ.एपीजे कलाम व श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांना अभिवादन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. १६ भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ( १५ ऑक्टोबर ) अर्थात ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ तसेच इचलकरंजीचे अधिपती कालवश श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचा सहावा स्मृतिदिन (१६ ऑक्टोबर ) या निमित्ताने प्रबोधन वाचनालयात दोन दिवस 'ग्रंथ प्रदर्शन ' आयोजित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे राजेंद्र मुठाणे आणि प्रा.संभाजी निकम यांच्या हस्ते अनुक्रमे डॉ. कलाम आणि श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यानी व प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ,श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला तसेच वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आणि मराठी भाषेला मिळालेला अभिषेक दर्जा याविषयी मनोगत व्यक्त केले. ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कोश वाङ्मय,संदर्भ साहित्य, ललित साहित्य आणि डॉ. कलाम यांची पुस्तके लावण्यात आली होती.

यावेळी अन्वर,पटेल ,शकील मुल्ला, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी,प्रा. गिरीश झुरळे, प्रियांका भोसले ,दिव्या शर्मा ,त्रिशला धंगे,पल्लवी जनवाडे, कोमल कांबळे, तेजश्री कुडाळकर, महेक मुल्ला, अनिसा पटेल, साक्षी खोत, सानिका शेडबाळे, सविता केसरकर, स्नेहा सुतार, धनश्री संकपाळ आदी उपस्थित होते. पांडूरंग पिसे यांनी आभार मानले.दोन दिवस सुरू असलेल्या या ग्रंथ प्रदर्शनाला साहित्य रसिक व वाचन प्रेमी नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने भेट दिली.

Post a Comment

Previous Post Next Post