प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरात सार्वजनिक ठिकाणी डिजिटल फलक लावले जात असल्याचे निदर्शनास आलेने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेणेच्या सुचना अतिक्रमण निर्मूलन विभागास दिलेल्या आहेत. या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांपासून सहा.आयुक्त विजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करणेत आलेली आहे.
आज बुधवार दि.९ ऑक्टोबर रोजी अतिक्रमण मोहिमेअंतर्गत शहापूर रोड, सांगली रोड, लिंबू चौक, लंगोटे मळा या ठिकाणी विनापरवाना लावणेत आलेले एकूण १८ डिजिटल बोर्ड जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच एस.टी.स्टँड परिसरातून दोन बंद अवस्थेत असलेले हातगाडे जप्त करण्यात आलेल्या आहेत.
आजच्या या मोहिमेमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, गणेश पुजारी, कुदरत गोलंदाज, धोंडीराम जावळे, धोंडीराम कांबळे, विकास लाखे, आदी कर्मचारी सहभागी झाले होते.