इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या 'स्वच्छता ही सेवा'' उपक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहिमेला शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद

 

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत स्वच्छता ही सेवा (SHS) स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर अभियानामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांच्या सहभागातून सामूहिक श्रमदाना व्दारे शहरातील विविध ४८  ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्याचा कार्यक्रम निश्चित केला होता. 

     यामध्ये शहरवासीयांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असलेने शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सर्व सामाजिक संघटना (NGO), सर्व बँका, वित्तीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी, शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, बचत गटाच्या महिला तसेच विविध महिला संघटना, कामगार संघटनाचे सदस्य, बिल्डर आणि आर्किटेक्ट असोशिएशन यांचे सदस्य, क्रीडा संस्था, तरुण मंडळाचे सदस्य  इत्यादी शहरातील सर्व घटकांना सहभागी होण्याचे आवाहन करणेत आले होते.              

  या मोहिमेचा प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ  आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त स्मृती पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील श्री शिवतीर्थ येथे करणेत आला.शहरातील विविध ४८ ठिकाणी जवळपास ४००० नागरिक आणि महानगरपालिकेचे जवळपास १००० अधिकारी कर्मचारी  या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

   

 याप्रसंगी मर्दा फौंडेशनचे शामसुंदर मर्दा अमृत भोसले यांचेसह शहरातील सर्व रोटरी परिवारातील सदस्य, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग समिती, संत गाडगे महाराज चारिटेबल ट्रस्ट, मनोरंजन मंडळ, पै. अमृत भोसले,तेज ज्ञान फौंडेशन, असोसिएशन ऑफ इंजीनियरिंग अँड आर्किटेक, जय हिंद मंडळ, जितो परिवार, ए.एस.सी. महाविद्यालय, शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचत गटाच्या महिला प्रतिनिधी,जेष्ठ नागरिक संघटना प्रतिनिधी, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, एन.सी.सी.चे विद्यार्थी, यांचेसह महानगर पालिकेचे सहा.आयुक्त विजय कावळे, वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, सहा.आयुक्त  विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, प्रशासन अधिकारी इरफान पटेल आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

         सर्व शहरवासीयांनी तसेच सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार या अभियानात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविल्याबद्दल सर्व उपस्थित शहरवासीयांचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून आभार व्यक्त करणेत येत आहे.



       

Post a Comment

Previous Post Next Post