हेर्ले माळभाग व चौगुले गल्ली परिसरात भटक्या व मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट,


 प्रेस मीडिया लाईव्ह   :

हेरले प्रतिनिधी :  संदीप कोले ;

 हातकणंगले तालुक्यातील  हेरले   येथे माळभाग पोस्ट कार्यालय परिसर ,चौगुले गल्ली, हायस्कूल, प्राथमिक शाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या व मोकाट  कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून    या मोकाट  कुत्र्यांनी  परिसरातून ये जा  करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.ग्रामपंचायतीने आठ दिवसात या  मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा निसर्ग संवर्धन ग्रुपचे अध्यक्ष विशाल परमाज यांनी दिला आहे. 

गावातील माळभाग व चौगुले गल्ली  परिसरात मोठ्या प्रमाणात  मोकाट भटकी कुत्री  फिरत असून  माळभाग परिसरात  शिक्षणासाठी  हायस्कूल व प्राथमिक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.   विद्यार्थ्यांच्या वर मोकाट कुत्र्यांच्या कडून जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता आहे.   माळभाग परिसरामध्ये मोकाट  व भटक्या  कुत्री मोठ्या प्रमाणात  वावरताना दिसत आहेत.

  मोकाट कुत्र्यानी अनेक  ग्रामस्थांना चावे घेऊन जखमी केले आहे.यामुळे या परिसरातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. माळभागातील एकाद्याचा जीव गेल्यानंतरच ग्रामपंचायत जागी होणार काय असा संतप्त सवाल ग्रामस्थांच्या मधून व्यक्त होत आहे.   .मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने या मोकाट कुत्र्यांचा तातडीने  बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील  ग्रामस्थांतून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post