25 हजारांची लाच घेताना राज्य कर अधिकारी ताब्यात. लाचलुचपत विभागाची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- दंडाची कारवाई टाळण्यासाठी  25 हजारांच्या लाचेची मागणी करणारा राज्य कर अधिकारी निवास श्रीपती पाटील (वय 45.रा.रॉयल आस्टोनिया ,नागाळा पार्क ,को) यांना लाचलुचपतच्या पथकाने 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली.

अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांची ऑइल व ग्रीस रिप्यकिंग करण्याची कंपनी आहे.या कंपनीची कागदपत्रे जीएसटी विभागाच्या नियमाप्रमाणे आहेत का या साठी नोटीस बजावली होती.दरम्यान संबंधित अधिकारी यांनी या कंपनीस भेट देऊन कंपनीचा  बँकेचा अकौंट नंबर जीएसटी पोर्टलला नोंदविला नाही म्हणुन दीड ते दोन हजारांचा दंड होईल असे सांगून दंड नको असल्यास 25 हजार रुपये लाचेची मागणी केली.दरम्यान तक्रारदार यांने लाचलुचपत विभागाला माहिती दिली.या विभागाने याची खात्री करून तक्रादाराकडुन 25 हजारांची लाच घेताना निवास पाटील यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून त्यांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील,पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला ,पोलिस अजय चव्हाण ,विकास माने,सुनिल घोसाळकर,सुधीर पाटील,सचिन पाटील,कृष्णा पाटील चालक कुराडे आणि दावणे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post