प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
दिनांक २४/१०/२०२४ रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, मौजे सांगवी गावचे हद्दीत अब्बास नावाच्या फार्म हाउसवर सिगारेट बनवणारी बनावट फॅक्टरी मोठया प्रमाणावर सिगारेट बनवुन वेगवेगळ्या ठिकाणी वितरीत केली जाते. सदरची गोपनीय माहीती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, यांनी सदरची माहीती पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे रायगड यांना दिली, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने समक्ष जावुन सदर परिसरात मिळालेल्या माहीतीप्रमाणे शोध घेतला. सांगवी गाव याठिकाणी नदीच्या कडेला असणा-या अलिशान फार्म हाउसला भक्कम तटबंदी व उंच असलेले कंपाउट आढळुन आले.
सदर कंपाउटला मोठे दरवाजे आतुन बंद आढुळन आले. सदर दरवाजे उघडण्यासाठी आवाज देण्यात आला परंतु आतुन प्रतिसाद मिळत नव्हता. त्यापैकी काही अंमलदारानी पाठीमागील नदीच्या बाजुकडुन कंपाउट वरून आतमध्ये प्रवेश केला, पोलीसांना पाहुन आतील एक कामगाराने त्यानंतर दरवाजा उघडला, त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पथकाने आतमध्ये जावुन पाहणी केली असता, एक मोठ्या गाळयामध्ये गोल्ड प्लॅग कंपनीच्या नावाचे सिगारेट निर्मिती करीत असलेले मोठ-मोठ्या मशीनवर १५ कामगार आढळुन आले. सदर वेळी कारखान्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर सिगारेट निर्मिती करण्याकरीता लागणारी प्रोसेस केलेली मिश्रीत सुंगधीत तंबाखु मोठ्या प्रमाणावर आढळून आली. सिगारेट बनविण्याकरीता लागणारा कागद, पॅकींग करण्याकरीता लागणारे बॉक्स, सिगारेट पॅक करण्याकरीता लागणारे पॅकेट व इतर सर्व संबंधित साहीत्य व सिगारेट तयार करणा-या मोठमोठया सेमी अॅटोमॅटिक ३ मशीन त्यावर सिगारेटची निर्मिती केली जात होती.
सदर निर्माण केलेली सिगारेट पॅकेटमध्ये पॅक करून पॅकेटचा बॉक्स व सदर बॉक्सचे मोठे कॅरेट पॅक केलेले मोठ्या प्रमाणावर आढळुन आले. सदरवेळी कामगाराकडे सिगारेट निर्मितीबाबत आवश्यक परवाने असल्याबाबत विचारणा केली परंतु त्यांच्याकडे कोणतेही परवाने अथवा माहीती प्राप्त झाली नाही. त्यामुळे गोल्ड प्लॅग कंपनीच्या नावाने सिगारेट बनविणारा बनावट कारखाना असल्याचे निष्पन्न झाले.
सदरची माहीती मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सोो. रायगड यांना देण्यात आली, मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सोो. यांनी घटनास्थळी भेट दिली व कारवाईबाबत सुचना दिल्या. त्यानंतर पंचाना बोलावुन तयार केलेल्या सिगारेटचा माल, सिगारेटला बनविण्याकरीता लागणारे मटेरियल, लागणारे साहीत्ये याचे मोजमाप करण्यात आले त्यावेळी एकुण ४,९४,४६,९६०/- रू. किंमतीचा मुद्देमाल पंचनामान्वये जागीच जप्त करून बनावट कारखाना चालवणारे वेगवेगळ्या राज्यातील एकुण १५ आरोपी विरूध्द कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २६७/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १२३,३१८(२) ३१८(४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात सदर १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीतांकडे चौकशी केली असता त्यांचेकडे सिगारेट बनविण्याकरीता लागणारे गोल्ड फ्लॅग कंपनीचे संमती अथवा करारपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना चालविण्याकरीता विद्युत महावितरण कंपनी यांना संशय येवु नये म्हणुन वीज न वापरता जनरेटर वापरत असल्याचे आढळुन आले. सदर अटक केलेले सर्व आरोपी हे आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड व इतर बाहेर राज्यातील असल्याने आढळन आले आहेत.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत. सदर तपासादरम्यान सदर कारखान्याचा मालक, जागेचा मालक, सिगारेट बनविण्याकरीता लागणारे मटेरियल कुठून आले, तयार केलेली सिगारेट कुठे-कुठे वितरीत करण्यात आली याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग