प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - आर.के.नगर येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घरमालक महेश बळवंत ढवळीकर (वय ४०, रा. श्री बंगला, आरकेनगर, पाचगाव) हे गणपतीपुळे येथे देवदर्शना साठी गेले होते . बंगल्यात कुणी नसल्याचे पाहुन ही चोरी झाली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचगाव, आरकेनगरात राहणारे महेश ढवळीकर हे शनिवारी कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते. सोमवारी रात्री परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी बंगल्यातील एका खोलीच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील तीन तोळ्यांच्या सोन्याच्या दोन चेन, तीन तोळ्यांच्या पाटल्या, तीन तोळ्यांच्या बांगड्या, एक तोळ्याचे गंठण, यासह एक तोळ्याच्या लहान दोन अंगठ्या आणि १६ हजारांची रोकड असा अंदाजे सहा लाखांचा मुदद्देमाल लंपास केला.
महेश ढ़वळीकर यांनी मंगळवारी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. करवीर पोलिस ठाण्याचे एक पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पहाणी करून माहिती घेतली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबद्दल सूचना दिल्या. करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे पुढ़ील तपास करीत आहेत. पोलिसांनी कपाटावरील ठसे घेतले आहेत. सराईत चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी सराईत चोरट्यांनी पाळत ठेऊन केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.