प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- न्यु पॅलेस परिसरातील सन सीटीमधील बंद बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यानी रोख ५ लाखाच्या रकमेसह साडेचार तोळे सोने, २५० ग्रॅम चांदीचे कॉईन, ५५० अमेरीकन डॉलर असा नऊ लाख ७१ हजाराचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. याची फिर्याद सुहास मणिलाल शहा (वय ५८, मूळ रा. हलकर्णी, गडहिंग्लज) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
यातील फिर्यादी सुहास शहा हे सिमेंटचे व्यापारी आहेत. शहा मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीचे रहिवासी असून ते सन सिटीमध्ये त्यांचा बंगला आहे. २२ ऑक्टोबरला येथील बंगला बंद करून ते गावी गेले होते. सोमवारी सायंकाळी परतले असता कुलूप उचकटलेले दिसून आले. चोरट्यांनी फ्लॅटच्या तिजोरीतील रोख ५ लाख रूपये, दीड तोळ्यांचे गंठण, दोन तोळ्यांचे कानातील जोड, एक तोळ्याचे गळ्यातील सोन्याचे पेडल, चांदीचे कॉईन व तार असा २५० ग्रॅमचा ऐवज व ५५० अमेरिकन डॉलर (भारतीय चलनानुसार ४६ हजार २०० रुपये) चोरून नेले.