देशी बनवट्टीचा कट्टा बाळगल्या प्रकरणी तरुणाला स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाच्या पथकाने घेतले ताब्यात

 गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार राजेश पाटील व त्यांच्या पथकाची महत्वपूर्ण कामगिरी

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानेआचारसंहिता सुरू झाली असून निवडणुकीच्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये व निवडणुका शांततेत पार पाडाव्यात म्हणून पोलिसांची सर्वच ठिकाणी हालचालींवर करडी नजर ठेवली असुन कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील पोलीस ॲक्शन मोडवर दिसुन येत आहेत.होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडाव्यात म्हणून पोलिस यंत्रणा सर्वत्र अलर्ट असल्याचे दिसत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असतांना देखीलअनेक ठिकाणी  दारू,गांजा,गुटखा असे अमली पदार्थांसह अवैद्य धंद्यांना व गुन्हेगारी पार्श्वभूमीला आळा घालण्यासाठी पोलीस रात्रंदिवस सतर्क असताना देखील

अलिबाग रायगड

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजेश पाटील पाटील यांना गुप्त बातमीदारां कडून मिळालेल्या माहितीनुसार एक २३ वर्षीय सौरभ जगदीश प्रसाद आर्या रा.रिस-मोहोपाडा ता.खालापुर हा खालापूर तालुक्यातील चौक गावच्या हद्दीत जुना मुंबई पुणे रोड लगत असलेल्या हॉटेल तेजस पार्किंग मध्ये एक देशी बनावटीचे सिंगल बोअर कट्टा व दोन जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे  Psi श्री लिंगप्पा सरगर यांच्या पथकाने त्याच्यावर झडप घालुन त्याच्याकडील एक देशी बनावटीचे सिंगल बोअर कट्टा अंदाजे ३५०००/रुपये किमतीचे व १०००/रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे सह सौरभ जगदीश प्रसाद आर्या याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं.४४८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम३,२५, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम (३७)(१)(अ)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पाटील,संदीप पाटील,पोलीस हवालदार यशवंत झेमसे,रवींद्र मुंडे, विकास खैरनार,सचिन शेलार,भरत तांदळे, सचिन वावेकर,यांच्या पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर , पो. हवा.रवींद्र मुंडे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post