यातील दोघांना 13 तारखेप्रर्यत पोलिस कोठडी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक व्यावसायिकाकडुन खंडणी उकळल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अजित पांडुरंग पवार (वय 47.रा.बिंदु चौक ) आणि मयुर उर्फ गणेश मोहन कांदळकर (वय 40.आझाद गल्ली) या दोघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 तारखेप्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.तोतया पत्रकार अन्सार रफिक मुल्ला याला रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असून अन्य संशयीताची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अधिक माहिती अशी की,सनी शंकर दर्डा (वय 35.रा.गांधीनगर ) यांचे लक्ष्मीपुरी परिसरात प्लास्टिक पिशव्यासह इतर साहित्याचे दुकान आहे.7 ऑक्टो.रोजी तोतया पत्रकार अन्सार मुल्ला हा दर्डा यांच्या दुकानात जाऊन मी पत्रकार असून तुमचं दुकान सील करणार असल्याचे सांगून 5 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती.एक तासाच्या आत रोख रक्कम दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देताच दर्डा यांनी पैशाची जुळवा जुळव करून अन्सारी याला तीन लाख रुपये दिले होते.त्या नंतर 8 ऑक्टो.रोजी पवार आणि मुल्ला हे आपल्या अन्य साथीदारासह दर्डा यांच्या दुकानात जाऊन दहशत निर्माण करत दर्डा यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली जर नाही दिल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने दर्डा भयभयीत होऊन त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तोतया पत्रकारासह त्याच्या अन्य साथीदारांच्या विरोधात फिर्याद दाखल केली .या घटनेचे गांभीर्य ओळखून लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयीतावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अजित पवार आणि कांदळकर यांना अटक करून या दोघांना अटक केली होती.यातील तिसरा संशयीत तोतया पत्रकार अन्सार मुल्ला याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली तर उर्वरित संशयीताची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.