अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचे वार्षिक अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथील "समर्पण " या संघाच्या प्रांत कार्यालयात संपन्न

प्रेस मीडिया लाईव्ह :

छत्रपती संभाजीनगर : (प्रतिनिधी)

आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी  सकाळी नऊ वाजता अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचे वार्षिक अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथील "समर्पण " या  संघाच्या प्रांत कार्यालयात संपन्न झाले. याचे उद्घाटन भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांचे हस्ते झाले. 


समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी प्रांत संघ चालक अनिल भालेराव आणि प्रांत कार्यवाह धनंजय धामणे यांची मुख्य उपस्थिती होती. उद्घाटनपर  भाषणात अध्यक्ष प्रदीप बापट यांनी संपर्क,आंतरिक सुरक्षा, वीर ग्राम योजना,सदस्य संख्या वाढविणे यावर भर दिला. त्यांनी पंचकर्म म्हणजे कुटुंब प्रबोधन,समरसता, नागरिक शिष्टाचार आणि स्वबोध जागरण,पर्यावरण याचे महत्व सांगितले.जीवन मूल्यावर आधारित परिवार व्यवस्था उभी करणे,पर्यावरणाला पोषक जीवनशैलीचा प्रसार, व्यक्तिगत-परिवारात - सामाजिक जीवनात समता- समरसतेचा अवलंब, सर्वप्रकारे स्वदेशीचा अर्थात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ' स्व 'चे प्रकटीकरण,तसेच दैनंदिन जीवनात नागरिक कर्तव्याचे पालन या पंचकर्म पाच विषयावर पुढील काळात काम करावे असे आवाहन यावेळी केले.

प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी प्रांत चे संघचालक अनिल भालेराव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  व अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या समन्वयाविषयी विचार थोडक्यात विषद केले. तसेच राष्ट्रीय कार्यात अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महत्व यावर पण भाष्य केले.

दुपारच्या सत्रामध्ये विदर्भ,मराठवाडा,मुंबई,गोवा मधील प्रांताध्यक्ष यांनी आपल्या भागातील कार्याचा अहवाल सादर केले.मातृशक्ती अंतर्गत पूनम कुमारी यांनी विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर विनय देवगावकर यांनी केले.सर्जन कॅप्टन मोहन रोटे यांनी सर्वांचे आभार मानले.राज्याचे संघटन मंत्री रमेश देसाई यांनी समारोप भाषण केले.राष्ट्रगीताने एक दिवसीय अधिवेशनाची सांगता झाली


अधिक माहितीसाठी

गिरीश दातार

8087051230

फोटो ओळ

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद राज्य अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी एअर मार्शल  प्रदीप बापट ( निवृत्त ),राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव,पूनमकुमारी

Post a Comment

Previous Post Next Post