बेडकिहाळ : बुधवार 23 रोजी मोटरसायकल रॅलीद्वारे कारखान्यांना शेतकरी संघटने वतीने निवेदन देण्यात येणार




प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ विक्रम शिंगाडे :

बेडकिहाळ येथे दि. 23 रोजी मोटरसायकल रॅलीद्वारे कारखान्यांना शेतकरी संघटने वतीने निवेदन देण्यात येणार आहे. साखर सम्राटांच्या साखर कारखान्यांकडून गत वर्षातील ऊस बिलापैकी २०० रुपयांचे देणे आणि चालू वर्षी राज्य सरकारने घोषित केलेल्या एफआरपीसह जादा दर जाहीर केल्याशिवाय यंदाचा गळीत हंगाम चालू करण्यात येऊ नये, जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही मागणी डावलून कारखाने सुरू केल्यास संघटनेच्या वतीने वेगळे पाऊल उचलावे लागतील, असा इशारा चिकोडी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्त्यासाहेब केस्ते यांनी दिला. ते बेडकिहाळ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी आयोजित बैठकी प्रसंगी बोलत होते. उपस्थितांचे स्वागत विकास समगे यांनी केले.

 यावेळी तात्यासाहेब केस्ते पुढे म्हणाले, येत्या बुधवार २३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सकाळी १० वाजता आपल्या परिसरातील साखर कारखान्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये मागील देणे असलेले २०० रुपये त्वरित देण्यात यावेत, तसेच

शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीसह आपला दर जाहीर करावा. याचबरोबर ऊस वजनकाटा चोख असावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात येणार आहे.

याचबरोबर शुक्रवार २५ रोजी जयसिंगपूर येथे होत असलेल्या २३ व्या ऊस परिषदेस चिकोडी व निपाणी भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले. या ऊस परिषदेत चालू गळीत हंगामाबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी बेडकिहाळ येथील बी. एस. संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या देशभत्त रत्नाप्पाण्णा सभागृहात बुधवार २३ रोजी सायंकाळी ५ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार असून मेळाव्यास परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले. या बैठकीप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाहुबली पाटील, शरद धनाप्पगोळ, अजित दमडरे, आण्णाप्पा शिंदे, आदी उपस्थित होते. संतोष पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post