प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकिहाळ प्रतिनिधी- डॉ विक्रम शिंगाडे
दसरा महोत्सवानिमित्त शनिवार १२ व १३ रोजी शांतीनगर सर्कल परिसरातील सरकारी प्राथमिक शाळेच्या मैदानावर पुरुषांसाठी कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते ग्रा. पं. सदस्य दत्तकुमार पाटील यांनी दिली.
यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क असून स्पर्धेसाठी अनुक्रमे १५००० १००००, ७००० व ५००० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर व बेस्ट ऑल राऊंडर अशा बक्षिसांनीही गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सुमारे २ हजार प्रेक्षक गॅलरीचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, विक्की खोत, शंकर पाटील, डॉ. शंकर माळी, संपतकुमार बोरगल,एम के शिरगुप्पे, सुभाष पाटील, कबड्डी संघाचे उपाध्यक्ष विशाल देसाई, यांच्यासह कबड्डी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. आभार संजय देसाई यांनी मानले.