प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील राशीवडे येथे मालवाहु टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत संजय वसंत कांबळे (वय 48 ) हे जागीच ठार झाले.तर त्यांची पत्नी सुरेखा संजय कांबळे (वय 40.रा.पुगांव)हे पती पत्नी ठार झाले.ही मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
यातील मयत हे सेंट्रीग काम करीत असून ते आपल्या पत्नी समवेत मोटारसायकल वरुन पुगांव येथुन राशीवडे गावी दिपावलीचा बाजार करण्यासाठी गेले होते.बाजार करुन परत येत असताना येळवडे येथून राशीवडेच्या दिशेने चाललेल्या मालवाहु टेम्पोने एका वळणावर जोराची धडक दिल्याने या अपघातात संजय कांबळे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले.तर त्यांची पत्नी सुरेखा या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.
या अपघाताची राधानगरी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तेथील रुग्णालयात हलविण्यात आला.या दोन्ही मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांच्या पश्च्यात विवाहित मुलीसह चार मुली आहेत.या पती पत्नीच्या अपघाताती मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे.