सायन पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव कारने धडक दिली

प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी :सुनील पाटील 

 नवी मुंबईतील जुईनगरजवळ सायन पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी बेदरकारपणे टेम्पो पार्किंग दिवे लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नरेंद्र राजेंद्र राय (वय, 45) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, गौरव विजयशंकर सिन्हा (वय, 45) आणि अभिनव रामकुमार सिन्हा (वय, 40) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही कस्टम अधिकारी असून रात्रीची शिफ्ट संपवून घरी जात असताना जुईनगर स्कायवॉकजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला त्यांची कार धडकली.

मृत नरेंद्र राय ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. तर अभिनव सिन्हा गाडी चालवत होते. अभिनव सिन्हा याला किरकोळ दुखापत झाली असून गौरव सिन्हा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post