शॉक लागून मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील हुपरी येथील मानसिंगराव श्रीपतराव घोरपडे (वय 66 रा.जवाहररोड ,श्रीचौक शिवाजीनगर ,हुपरी) यांचा फाइव्ह स्टार एमआयडीसी येथे असलेल्या डेल्टा इरिगेशन एल.एल.पी.नावाच्या कंपनीत काम करीत असताना अचानक शॉक लागून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी सव्वा पाचच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत हे वरील कंपनीत नोकरीस असून आज ते काम करीत असताना अचानक शॉक लागून जखमी झाल्याने कंपनीने प्रथम त्यांना डॉ.शेळके यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार करून कंपनीने त्यांना घरी सोडून गेले ते घरी आल्यानंतर काही वेळाने त्रास जाणवू लागल्याने त्यातच ते  बेशुध्दावस्थेत पडल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी  बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी ,एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post