प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 8 सप्टेंबर पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. यामध्ये केरळ महोत्सव, उगवते तारे व इंद्रधनू, भारत रंग रंगीला, मराठी कविसंमेलन, गाणी बाबूजी-गदिमांची, लावणी, मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, महिलांची नृत्य स्पर्धा, अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित हिंदी चित्रपट गीते व नृत्य, लिजंट्स ऑफ बॉलीवूड, व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल व करंडक, रॉकिंग 90s, उत्सव (भारती विद्यापीठ), रोटरीचे इंद्रधनु, शाळांचे समूह नृत्य असे विविध १५ सांस्कृतिक कार्यक्रम दि. 8 ते 16 सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होतील. याबरोबर गोल्फ, बॉक्सिंग, मल्लखांब व डर्ट ट्रॅक या क्रीडा स्पर्धा देखील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहे.
याचे सविस्तर महिती देण्यासाठी शुक्रवार, दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता, पत्रकार भवन, नवी पेठे पुणे येथे पत्रकार परिषद आयोजीत केली आहे.