अपात्र वनजमीन धारकांच्या न्याय हक्कासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटना करणार एक दिवस धरणा आंदोलनं

उपविभागीय अधिकारी कार्यालय तुमसर यांच्या सहीत पोलिस स्टेशन कडे निवेदन सादर


प्रेस मीडिया लाईव्ह :

 तुमसर - अनुसूचित जमाती व ईतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 हा कायदा जरी वन जमीन धारकांच्या न्याय हक्कासाठी निर्गमित झालेला असला तरी त्यामधील अटी व शर्ती चा अभ्यास केला तर असे निदर्शनात येते की केवळ पुराव्या अभावी बहुतांश वन जमीन धारक मालकी हक्काच्या पट्ट्या पासून वंचित आहेत म्हणून तालुक्यातील मौजे आंबागड येथील बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सदस्य काशिराम ठाकरे यांनी विशेष पुढाकार घेऊन बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दिनांक 19/9/2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय तुमसर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे . 

याबाबत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे व विदर्भ युवा नेते विलास वानखेडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालय तुमसर सहीत पोलिस स्टेशन कडे निवेदन सादर करण्यात आले असुन संविधानात्मक मार्गाने लोकशाही पद्धतीने दिनांक 19/9/2024रोजी आंदोलनं करणार असुन या आंदोलनाला प्रामुख्याने दलीत पँथर चे केंद्रीय कार्य अध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत म्हणून तालुक्यातील सर्व बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वनजमिन धारक शेतकऱ्यानी सहभगी होण्याचे आवाहन अंबागड येथील बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सदस्य काशिराम ठाकरे सहीत राजेश बावणे, शांताबाई पावसे यांनी केले असुन यावेळी मौजा खापा, आलेसूर, गोबरवाही, लेंडेझरी, पांगडी, मेटवानी, नाकाडोंगरी येथील बिगर सातबारा शेतकरी उपस्थित होते 


काशिराम ठाकरे सदस्य 

बिगर सातबारा शेतकरी संघटना मू आंबगड पो मेटवनी 

ता, तुमसर जी भंडारा 








Post a Comment

Previous Post Next Post