प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
कर्जत तालुक्यातील रा. मा.७६ नेरळ ते भडवळ प्रा.मा..०४ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी शासन विभागाकडील मुबंई महानगर प्रदेश प्राधिकरण अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ५० लक्ष मंजूर निधीनुसार ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम व एक वर्षात रस्त्याची झालेली अवस्था पाहाता निकृष्ठ झाले असल्याचे दिसत असल्याने, सदर काम हे ठेकेदाराकडून या रस्त्याच्या कामात आधोरेखीत शासन नियमांचे उल्लघन होत आहे का ?
तसेच नागरीसुविधांच्या दुष्ट्रीने सदर रस्ता नागरीकांसाठी टिकेल का? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तर सदर रस्त्याच्या झालेल्या कामाच्या दर्जाचे मुल्यमापन हे शासन नियमानुसार संबधित विभागाचे अधिकारी हे ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करणार का? असा प्रश्न मात्र सामान्य नागरीकांकडून उपस्थित होत आहे.
रा. मा.७६ नेरळ ते भडवळ प्रा.मा..०४ या सत्याची अवस्था हि बिकट अवस्था झाली असल्याने या रस्त्यावरून मात्र भडवळ व त्या परिसरातील वाडया वस्ती वरील लोकांचा नेरळ ममदापूर - भडवळ हा प्रवास मोठया तारेवची कसरत ठरत असल्याने व सदर रस्त्यावरील लोकांचा प्रवास सुख समुद्धीचा व्हावा. यासाठी शासनस्तरावरून मुबंई महानगर प्रदेश प्राधिकरण अंतर्गत ३ कोटी ५० लक्ष निधी मंजूर करून सदर नागरिसुविधानुसार सिमेंट काँक्रीट रस्ता, पूल, मोऱ्या व गटार या प्रमाणे सदर कामांच्या ठेक्या संदर्भात रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागा कडून मे. फायरविंग इन्फ्राकोन सव्हीस प्रा.लि. मेमीनथ शॉपिंग सेंटर -६ ता. कर्जत, जि. रायगड या नांवाने कार्यारंभ आदेश देण्यात आल्या प्रमाणे ठेकेदाराकडून सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या झालेल्या कामाची वस्तुस्थिती पाहाता व सदर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या झालेली अवस्था पाहाता, तसेच सदर रस्त्यावर पडलेल्या भेगा व वरील काँक्रीट हे पावसात वाहून गेल्याने पडलेल्या खड्डयांमध्ये सिमेंट भरूण मलमपट्टी पाहाता, व सदर रस्त्याचे साईड पट्टीवरील मुरूमची भर टाकली नसल्याने मात्र सामान्य नागरिकांमधून सदर रस्त्याचे कामाच्या दर्जा बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तर सदर रस्त्याचे काम हे मंजूर इस्टिमेट प्रमाणे ठेकेदारानी केले नसल्याचे ही सामान्य नागरिकांनकडून बोलले जात आहे. सदर रस्त्याच्या झालेल्या कामाच्या दर्जाचे मुल्यमापन हे शासन नियमानुसार संबधित विभागाचे अधिकारी करणार का? व ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करणार का? असा प्रश्न मात्र सामान्य नागरीकांकडून उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया.....
ममदापूर भडवळ रस्त्यासाठी एम एम आर डी कडून ३ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला मात्र ठेकेदाराठी केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची झालेली आवस्था पाहाता. व एका वर्षात पडलेले तडे व पावसात वाहून गेलेले काँक्रीट व लपविण्यासाठी ठेकेदारानी सारवलेले सिमेंट पाहाता, व साईड पट्टी भरली नसल्याने शासनाचे ३ कोटी ५० लाख माती मोल होणार का?
भगवान जामघरे, ग्रामस्थ भडवळ,
सदर रस्त्याचे कामाचे मुल्यमापन करण्यात आले नसुन, सदर ठेकेदाराला या कामाचे बिल आदा करण्यात आले नाही. मुल्यामापन करताना सदर रस्त्यात त्रुटी आढळल्यास व खराब रस्त्याचे झालेले काम हे संबधीत ठेकेदाराकडून स्वखर्चातून करून घेतले जाईल,
निलेश खिलारे, उपअभियंता रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग कर्जत उप कार्यालय,