प्रेस मीडिया लाईव्ह :
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) :-
जिल्हा कोर्ट फूटओव्हर दारुड्यांचा अड्डा बनला असून येथे दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या दिसत असून याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा कोर्ट फूटओव्हर येथून अनेक जण ये जा करतात. रात्रीच्या वेळी ही पार्टी करत असून तेथेच दारूचे बोतल जेवण वगैरे तिथेच फेकलेले असतात या घाणमुळे दुर्गंधी पसरलेली असतात महानगरपालिकेने या फूट ओव्हर वर साफसफाईकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे. कोर्टात कामानिमित्त या फूटओव्हरवरून अनेक जण ये जा करतात मात्र या फूटओव्हरवर प्रचंड घाणीचे साम्राज्यही पसरले असून सर्वत्र
दारूड्यांनी दारूच्या बाटल्या दारू ढोसून तशाच सोडून दिलेल्या आहेत. रात्रीच्या वेळेस येथे दारूडे मोठ्या संख्येने बसलेले असतात असे काही नागरिकांचे म्हणणे ओह. याकडे पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.