प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
माजी आमदार बाळाराम दत्तूशेठ पाटील यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शासनाकडून सन 2020 - 2021 करिता महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कोकण शिक्षक मतदार संघातून संधी मिळालेले माजी आमदार बाळाराम पाटील यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी 2020-21 या कालावधीसाठी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांची निवड झाल्यामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र विधान मंडळाचे सदस्य म्हणून 2017 ते 2023 या कालावधीत पुरस्कार दिले गेले. बाळाराम पाटील यांची 2020- 21 सालासाठी निवड करण्यात आली. या पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.