प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
जे एनएन, मुंबई. Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. राज्यात 15 ते 17 ऑक्टोबर पर्यंत आचार संहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तसेच राज्यात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान तर 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी काल महाराष्ट्रात दाखल झाले असून, हे अधिकारी आज राजकीय पक्षासोबत बैठक घेणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अधिकारी 28 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आजपासून निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यास सुरुवात करणार आहे. आढावा दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहे. तसेच राज्यातील पोलिस अधिकारी व सनदी अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठकही आज केंद्रीय निवडणूक अधिकारी घेणार आहे.
असा असणार आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा दौरा
आज सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक.
दुपारी 1 वाजता सीईओ, नोडल अधिकारी सोबत बैठक.
दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, इन्कम टॅक्स विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकारीसोबत बैठक.सांयकाळी 5 वाजता मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिका-यांशी कायदा आणि सुवस्थावर बैठक.
28 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक घेणार आहे.
दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेणार आहे.नि वडणूक अधिकारी रात्री उशिरा मुंबईहून दिल्लीकडे रवाना होतील.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्व विभागाला विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आचार संहिता व निवडणूक तारखेचा अहवाल तयार करून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अहवाल सादर करतील.