प्रेस मीडिया लाईव्ह :
वसई : जनहित फाउंडेशन आयोजित संघर्षनायक मीडिया राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ आयोजित करण्यात आला आहे.समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा तसेच संस्थांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहेत.पुरुषांसाठी आत्मसन्मान गौरव पुरस्कार व महिलांसाठी नारी शक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्याचे योजिले आहे. सदर कार्यक्रम दिनांक ६ ऑक्टोबर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल,एम.जी. रोड,वसई ( पश्चिम ) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नरसिंह दुबे आयुर्वेद मेडिकल कॉलेज च्या डाॅ. ऋजुता ओमप्रकाश दुबे विश्वस्त व स्त्रीरोग प्रसूतितंत्र विभागप्रमुख, नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय. सचिव, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलन उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक मा.श्री.फिरोज मुल्ला सर तसेच संघर्षनायक मीडिया चे संपादक आणि पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.संतोष एस.आठवले उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन जनहित फाउंडेशन चे अध्यक्ष मा.श्री. उमेश जामसंडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे .अनेक संस्थांनी तसेच नामवंतांनी यात सहभाग घेतला आहे.पालघर,ठाणे,आणि मुंबई विभागातील नागरिकांनी सदर कार्यक्रमास हजर राहावे अशी विनंती जनहित फाउंडेशन चे सचिव श्री.महेंद्र वाघमारे यांनी केले आहे.