प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड प्रतिनिधी :
तालुका शिरोळ दत्तवाड येथील उदय पाटील युवा फाउंडेशन यांच्या वतीने पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे देण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेले मराठी एस न्यूजचे शिरोळ तालुका प्रतिनिधी मा.श्री. अर्जुन धुमाळे, महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील तालुका स्तरीय पुरस्कार बाबासो पाटील आणि दर्पणकार पुरस्कार मिळालेला मा.श्री.मिलींद देशपांडे या व्यक्तींचा जाहीर सत्कार करण्यात आला . सदरचा कार्यक्रम श्री दत्त साखर कारखाना शिरोळ येथे उद्यान पंडीत मा.श्री. गणपतराव पाटील दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मा.श्री उदय पाटील, चंद्रशेखर कलगी, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, युवराज घोरपडे, अभिनंदन टोपाई, अक्षय हलकर, बाबासो पाटील ,मिलिंद देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत आप्पाजी गोळ, प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला .