साप्ताहिक इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक रविंद्र कांबळे यांना "दर्पण" पुरस्कार जाहीर..

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

जांभळी गावचे सुपुत्र व साप्ताहिक इंडियाचा आवाज व  न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक रविंद्र कांबळे यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेसतर्फे उत्कृष्ट पत्रकार म्हणून दिल्या जाणाऱ्या "दर्पण" पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.

           सर्वसामान्य जनतेच्या व्यथा व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यासारख्या अनेक प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे  न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्री. रविंद्र कांबळे यांनी केला आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात ही उल्लेखनीय कार्य करीत आहेत. तसेच सन 2019 ला साप्ताहिक इंडियाचा आवाजची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते सन 2024 पर्यंत चा पत्रकार ते संपादक हा प्रवास करत असताना प्रथम काही वर्ष एका साप्ताहिकांमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना काही लोकांच्या व्यथा न मांडता आल्याने एक ठोस भूमिका घेऊन स्वतःच्या वृत्तपत्राची स्थापना केली. तेव्हापासून अतिशय कष्टातून इंडियाचा आवाज या चॅनेल व साप्ताहिकाची स्थापन करून लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत आणि हे सर्व करत असताना आपण गोरगरीब दिन दुबळ्यासाठी लढत असतो आणि आपल्या पाठीवरती कुणीतरी कौतुकाची थाप द्यावी तशी थाप या पुणे एक्सप्रेसने संपादक रविंद्र कांबळे यांच्या पाठीवरती दिल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी या परिसरातून अनेक शुभेच्छांचे फोन तसेच मेसेज हे येत असल्याने काम करण्याचा हुरुप मनामध्ये निर्माण झाला असल्याचे पत्रकार परिषदेत रवींद्र कांबळे यांनी सांगितले तसेच पुणे एक्सप्रेस टीमचे ही या निमित्ताने धन्यवाद मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post