प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेला घाम फुटत नाही, अधिकारी कारवाई करत नाहीत. भाजप त्यांच्या लाडक्या ठेकेदार यांना पालिका अधिकारी घाबरत आहेत का? नवीन बनवलेले रस्ते एका वर्षात खराब होतात, बुजवलेले खड्डे 5 दिवसात खराब होत आहेत. किती मोठं भ्रष्टाचार भाजप हे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत घडवून आणत आहे याचा अंदाज पुणेकरांना आला आहे.
आम आदमी पार्टी च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा संयम सुटला आहे आत्ता, हजारो वेळी फोन करून, पत्रव्यवहार, आंदोलन करून प्रश्न सुटत नाही.शेवटी पथ विभाग प्रमुख श्री अनिरुद्ध पावसकर यांची खुर्ची उचलून टेबल वर ठेवून तिला पुष्पहार अर्पण केले.
सर्व खड्डे 5 दिवसात बुजवले नाहीत तर आम्ही पालिकेला टाळे ठोकू. दुर्दैव म्हणजे महामहील राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी पालिकेला खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. पुणे शहराची नाचक्की भाजप च्या कार्यकाळात जास्त होत आहे. *श्री सुदर्शन जगदाळे, पुणे शहर अध्यक्ष.सर्व रस्त्यांची *दोष दायित्व कालावधी* प्रमाणे श्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी - श्री मुकुंद किर्दत, प्रवक्ते
पालिकेला जाग यावी म्हणून श्री अनिरुद्ध पावसकर यांची खुर्ची उचलून टेबल वर ठवली आणि हार फुल घातले. कारवाई झाली नाही तरी चप्पल चा पुष्पहार घालू. *श्री सतीश यादव, महासचिव.*प्रसंगी उपस्थित
यावेळी उपस्थित शहराध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, महिला आघाडी अध्यक्ष भोसले, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, अमित मस्के, निलेश वांजळे, शंकर पोटघन, सुभाष करांडे, विकास चव्हाण, कानिफनाथ घोरपडे, किरण साठे, अविनाश भाकरे, संतोष काळे उमेश बागडे, अभिजीत गायकवाड ऋषिकेश मारणे, गुणाजी मोरे, सुरेखा भोसले महिला आघाडी अध्यक्ष, शंकर थोरात.
पुणे शहर मीडिया