विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलमताई गोऱ्हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डा. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुण्यातील " सिल्वर रॉक्स" या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली.  उपसभापती डाँ. नीलमताई गोऱ्हे यांनी मनोभावे गणरायाची आरती करून राज्याच्या सुखसमृद्धी व भरभराटीची कामना केली. 

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे. भविष्यात होणारी विधानसभा निवडणूक शांततामय मार्गाने आणि लोकशाही मजबूत करणारी असो अशी प्रार्थना डाँ. नीलमताई गोऱ्हे यांनी गणरायाकडे केली.

Post a Comment

Previous Post Next Post