जन संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री शाहुराज माने यांच्या नेत्रत्वात महाराष्ट्रातील हजारो ठेविदारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : सम्रद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज सोसायटी ली पुणे. या सोसायटी मध्ये गुंतवणूक केलेल्या ठेविदारांचा,मा ना मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्य मंत्री यांच्या कर्वे रोडवरील पुणे येथील कार्यालयावर सोमवार दि 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता भव्य मोर्चा.  सम्रद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को आँपरेटिव्ह सोसायटी ली पुणे. या सोसायटी चे मुख्य संचालक महेश मोतेवार यांनी ठेविदारांचा ठेवी मुदत पुर्तिनंतर ही ठेवीदारांना परत न दिल्याने त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

त्या अनुषंगाने ईडी, सिबीआय च्या माध्यमातून सदर सोसायटीच्या सर्व शाखांवर निर्बंध लावण्यात आले होते. पुढे ही सोसायटी लिक्विडेशन मध्ये काढून, केंद्रीय निबंधक यांच्या वतीने 2016 साली लिक्विडेटर ची नियुक्ती केली होती. आणि 2 आँगष्ट 2018 रोजी *महाराष्ट्र ठेविदारांचा हितसंबंधी अधिनियम 1999* नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी (SDO) हवेली पुणे, यांना आदेशित करुन संबंधित सोसायटीच्या, महाराष्ट्रातील मालमत्ता, वहाणे,व बँक खाते याची सुची देवुन सर्व मालमत्तेचे अधिग्रहण करणेसाठी सुचित केले होते. त्यानुसार सर्व मालमत्ता अधिग्रहित होणे आवश्यक होते,परंतु अध्याप 50 % मालमत्ता सोसायटी च्या आणि महेश मोतेवार, आणि त्याचे अन्य सहकारी यांच्या नावे आहेत. 


या सर्व प्रकिया होवून आठ वर्षे पूर्ण झाली पण अध्याप ठेविदारांचा ठेवि परत मिळाल्या नाहीत.* याची गंभीर दखल घेऊन मा ना मुरलीधर मोहोळ आण्णा केंद्रीय सहकार राज्य मंत्री, यांनी लक्ष घालून संबंधित असलेल्या सर्व विभागाचे अधिकारी यांना आदेशित करुन,मागच्या आठ वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावे. या मागणी साठी  *सोमवार दि 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता,महर्षी कर्वे यांच्या पुतळ्यापासुन ते मंत्रीमहोदय यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत.जन संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री शाहुराज माने यांच्या नेत्रत्वात महाराष्ट्रातील हजारो ठेविदारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post