जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा आमरण उपोषणाचा माजी सैनिकांचा इशारा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राज्य शासनात कार्यरत माजी सैनिकांना  'जुनी पेन्शन योजना सुरू करा' या मागणीसाठी   शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सैनिक कल्याण विभाग  संचालक महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत  मुख्यमंत्री  आणि  अपर मुख्य सचिव  सामान्य प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आले. माजी सैनिकांची मागणी पूर्ण न झाल्यास  आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १२  वाजता घोरपडी येथील कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.


 शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष बाजीराव देशमुख ,सरचिटणीस बाळासाहेब जाधव, पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, सैनिक कल्याण विभाग उपाध्यक्ष संजय मोहिते, राज्य सल्लागार सुरेश माने, दिलावर शादीवान, विलास घाडगे, विभागीय सहसचिव संजय बोराटे, पुणे जिल्हाध्यक्ष तथा माजी चिटणीस दीपक पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष शरद शिंदे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र शासनचे संचालक कर्नल(नि) दीपक ठोंगे  तसेच उपसंचालक मेजर(नि) शिल्पा खोपकर, लेफ्टनंट कर्नल (नि) हांगे, मेजर (नि) कापले यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन सविस्तर मुद्दे मांडले.

 २००५ पूर्वी राज्य शासनात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ च्या योजनेनुसार  जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील २९००  माजी सैनिक मागील पाच वर्षापासून लढा देत आहेत .त्यानंतर सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप शासन निर्णय अथवा अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने  अखेर  माजी सैनिक  संघटनेनं आंदोलनाचा हा निर्णय घेतला. 




Post a Comment

Previous Post Next Post