श्री गणेशोत्सवाकरिता पुणे महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता सर्व स्तरांवरुनजय्यत तयारी करण्यात आलेली असून याकरिता मनपाचे विविध विभाग, क्षेत्रिय कार्यालयांनी आपल्या स्तरावरही जय्यत तयारी केलेली आहे.

नदीकिनार परिसरातील विसर्जन घाटांवरील दुरुस्ती, रंगरंगोटी, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, विसर्जन घाटावरील विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्थेचे नियोजन या स्वरुपाच्या कामाबरोबरच सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, दोन पाळ्यांतून अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळती ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करणेकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आलेली आहे.  सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे. 
प्रमुख विसर्जन घाट खालीलप्रमाणे.

संगम घाट

१०

ओंकारेश्वर

वृध्देश्वर घाट / सिध्देश्वर घाट

११

पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे

अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ)

१२

खंडोजी बाब चौक

बापूघाट (नारायण पेठ)

१३

गरवारे कॉलेजची मागील बाजू

विठ्ठल मंदिर (अलका चौक)

१४

दत्तवाडी घाट

ठोसरपागा घाट

१५

औंधगाव घाट

राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर

१६

बंडगार्डन घाट

चिमा उद्यान येरवडा

१७

पांचाळेश्वर घाट

वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १ नदीकिनार




विविध क्षेत्रिय कार्यालयांकडील विसर्जन व्यवस्था, हौद, टाक्या यांच्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत.


भवानीपेठ क्षेत्रिय कार्यालय- 


भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडील कार्यक्षेत्रातील गणेश विसर्जनासाठी सावित्रीबाई फुले प्रशाला, आनंदीबाई कर्वे शाळा, स्वारगेट पोलिस लाईन या ठिकाणी विसर्जन हौद करणेत आले आहे. 


विद्युत विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये दोन शिफ्टमध्ये सेवकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या असून विसर्जन मार्गावर तसेच मुख्य ठिकाणी गुरुवार पेठ, पालखी चौक, लोहियानगर, काशिवाडी, लक्ष्मीरोड, सोमवार पेठ, रास्ता पेठ या ठिकाणी सदर सेवकांच्या नेमणूका करुन विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.


स्वच्छतेबाबत भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात व मिरवणुकीच्या मार्गावर झाडणकाम, ग्रुप स्विपींग करुन पावडर मारुन किटकनाशक औषध फवारणी करणे तसेच कचरा दोन शिफ्टमध्ये वाहतुक करुन घेणे व परिसर स्वच्छ करणे इ. कामे तत्परतेने करणेत येणार आहे. या कामी क्षेत्रिय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रिय अधिकारी, उप अभियंता, प्रभाग अधिकारी, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम व सफाई सेवक तसेच विद्युत विभागाकडील कर्मचारी व तांत्रिक विभागाकडील अभियंता यांच्या कामकाजाचे नियोजन करणेत आले आहे.


सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालय- 


सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील  श्रीगणेश विसर्जनाच्या ठिकाणी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता ,कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता,आरोग्य विभागाकडील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी विभागीय आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक, मुकादम,मिस्त्री, बिगारी इत्यादी सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.  गणेश विसर्जन हौद ,तात्पुरती लोखंडी टाकी व्यवस्था, जीवरक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. जीवरक्षक व आरोग्य विभागाकडील सेवकांनी विसर्जन होईपर्यंत व परीसराची पूर्ण स्वच्छता होईपर्यंत आरोग्य विभागाकडील सेवकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी थांबणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

खालील ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था करणेत आलेली आहे-


१) जनता वसाहत कॅनॉल, पर्वती पायथा, २) जयभवानीनगर, जनता बाग मागे, ३) गोल्डन व्हिल पूल, ४) चूनाभट्टी कॅनॉल, ५) पानमळा कॅनॉल


वारजे कर्वेनगर कार्यालय -


वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ३ विसर्जन हौद, २६ लोखंडी टाक्या, ९ मूर्ती संकलन केंद्रे, १५ ठिकाणी फायबर शौचालये अशी सोय करण्यात आलेली आहे. 

१)राजारामपूल,डी.पी रोड, २) साई मंदिर, सौरभ सोसायटी समोर, डीपी रोड, ३) राहूलनगर, जितेंद्र अभिषेकी उद्यानाशोजारी, ४) मनमोहन सोसायटी, कर्वेनगर, ५) अनुसयाबाई खिलारे शाळा, ६)पंडित दीनदयाळ शाळा  ७) वारजे पुलाखाली वारजे, ८) मॅजेस्टिक हॉल, सर्व्हिस रस्ता, ९) अतुलनगर कॉर्नर, १०) गार्डन सिटी वारजे, ११) शिवणे शाळा, १२) उत्तमनगर शाळा, १३) आठवले चौक, १४) सम्राट अशोक शाळा १५)तपोधाम सोसायटी १६)न्यू कोपरे शाळा १७)कोंढवे धावडे गेट नं१० १८)दांगट पाटील नगर कमान एक, शिवाने १९)नादब्रम्ह सोसायटी २०)विकास चौक कर्वेनगर २१)वारघडे चौक कर्वेनगर २२)हिंगणे होम कॉलनी २३)शामाप्रसाद मुखर्जी उद्यान २४) वारजे हायवे उरीट नगर 

वर नमूद केलेल्या ठिकाणी विद्युत व्यवस्था सी.सी.टी.व्ही. कॅमेरा यंत्रणा, मांडव व इतर व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच रोटरी क्लब युवा, कोथरूड मार्फत निर्माल्या निर्मुलन करणेसाठी श्रेडींग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय-


१) कै गंगुबाई भिमाले उद्यान, सॅलिसबरी पार्क २) स.नं. ३८८, वैरागे मनपा उद्यान, मीरा सोसायटी ३) पुजारी गार्डन मिनाताई ठाकरे वसाहत, ४), ५) पाटबंधारे कार्यालय शेजारी स्वारगेट ६) प्रेमनगर वाहनतळ सिटी प्राइड शेजारी पार्किंग, ७) गंगाधाम चौक स.नं. ५७८ बिबवेवाडी अग्निशमन केंद्र ८) कै.यशवंतराव चव्हाण शाळा ९) चिंतामणराव देशमुख शाळा इंदिरानगर १०)अप्पर सुप्पर इंदिरा नगर ११)व्हीआयटी कॉलेज जवळ १२)अप्पर बस स्टाप १३)सालीटर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता 

प्रभागामधील विसर्जन हौदाच्या ठिकाणी  निर्माल्य कलश, कंटेनर, हॅलोजन व्यवस्था, जनरेटर व्यवस्था, ठिकाणी मंडप व्यवस्था व स्वच्छतेविषयक व्यवस्था करणेत आलेली आहे.

सदर व्यवस्थापनेसाठी प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मोकादम, विद्युत विभागातील सर्व सेवक, जीव रक्षक तसेच इतर सेवकांची नेमणूक करणेत आलेली असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.


रामटेकडी, वानवडी  क्षेत्रिय कार्यालय - 


१)शिंदे छत्री २)जांभूळकर मळा, घोरपडी कॅनॉल ३)सोपान बाग कॅनॉल ४) संत गाडगे महाराज शाळा 


धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय -


१)तळजाई मंदिर तळजाई टेकडी, २) ढुमे क्रिडांगण, सहजीवन सोसायटी पटांगण, ३) शिंदे हायस्कूल जवळ, तळजाई कडे जाणारा रस्ता, ४) तुळशीबागवाले कॉलनी मैदानाजवळ, ५) मनपा शाळा क्र. ९१ जी चे मागे, रामचंद्र नगर, धनकवडी गाव, ६) गुलाबनगर, कानिफनाथ नगर, धनकवडी पोस्ट ऑफीस समोर ७) स.नं. ३५ जावळकर शॉप समोर, राजे चौक ८) आंबेगाव पठार, आरोग्य कोठी लगत (साई सिध्दी) ९) कात्रज रॅम्प (कात्रज डेअरी शेजारी) १०) कात्रज गावठाण तलाव, ११) थोरवे विद्यालय, १२) गायमुख चौक, आंबेगाव, १३) जांभूळवाडी तलाव, १४) चिंतामणी शाळे समोर, अवंती कॉम्प्लेक्स जवळील अॅमिनिटी स्पेस १५) अशोक लेलॅण्ड कॅम्प लोखंडी टाकी  तसेच नव्याने समाविष्ट झालेले गावांमध्ये सुद्धा नागरिकांच्या सोयीकरिता विसर्जन हौद, टाक्या, व संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


शिवाजीनगर- घोलेरोड  क्षेत्रिय कार्यालय -


१)मुळारोड घाट २) संगमवाडी घाट ३) स्फुर्ती सोसायटी घाट ४) वृध्देश्वर घाट, ५) पतंगा घाट ६) पांचाळेश्वर घाट


हडपसर , मुंढवा  क्षेत्रिय कार्यालय - 


१)मुंढवा गाव नदीकिनार २) भोसले गार्डन-हडपसर, स.नं. १५ लक्ष्मी कॉनर, ३) स.नं. १६ सातव प्लॉट, ४) इंग्लिश मिडीयम शाळा, डीपी रोड, ५) हिंगणे मळा, कॅनॉल घाट, ६) ननावरे बिल्डींग समोर कॅनॉल घाट, ७) उन्नतीनगर, कॅनॉल घाट, ८) हनुमान सेवा ट्रस्ट, बालउद्यान वाडी, काळेपडळ, ९) श्रीराम चौक, रुणवाल सोसयाटी, हांडेवाडी रस्ता, १०) संकेत पार्क समोर, तरवडे वस्ती, महंमद रोड, ११) कुंभारवाडा नदीलगत, केशवनगर, १२) साडेसतरा नळी उद्यानात, १३) गंगानगर महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, १४) नवमहाराष्ट्र तरुण मंडळ, पवार आळी जवळ, फुरसुंगी १५) पाणीपुरवठा तळे जुन्या पुलाशेजारी, फुरसुंगी, १६) मारुती मंदिराजवळ, उरुळी देवाची


कै. बा.स. ढोलेपाटील क्षेत्रिय कार्यालय -


१)क्वालिटी बेकरी कॅनॉल २) बहिरोबा पंपिंग स्टेशन नदीपात्रातील घाट ३) बंडगार्डन हौद ४) संगम घाट ५) शाहू तलाव (टँक) हौद ६) पिंगळे वस्ती (लक्ष्मी माता मंदिरा शेजारी).


येरवडा कळस  क्षेत्रिय कार्यालय- 


१)श्री संत माळी महाराज २) चव्हाण चाळ ३) कळसगाव घाट ४) भारतनगर घाट ५) शांतीनगर घाट  ६)  धानोरी विहीर

येरवडा क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी चिमा गार्डन घाट येरवडा येथे एक अम्बुलंस मेडिकल टीमची व्यवस्था करणेत येणार आहे.


कसबा विश्रामबागवाडा  क्षेत्रिय कार्यालय -


५ विसर्जन घाट, ४३ टाक्या, ची सोय करणेत आलेली असून कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छतेचे व कचरा साफसफाईची कामे तसेच प्रमुख रस्त्यावर १९ पोलीस मदत केंद्रे, ३२ वाचटॉवर, ३ स्वागत कक्ष हिरकणी कक्ष ई. ची सोय करण्यात आलेली आहे. 


कोथरुड बावधन   क्षेत्रिय कार्यालय -


१)गुरु गणेश नगर, शांतीबन चौक, २) लोकमान्य कॉलनी, जीत ग्राऊंड, ३) उजवी भुसारी कॉलनी, ४) बावधन शाहा, ५) मराठा मंदिरामागे, ६) भारती विद्यापीठ कन्याशाळेमागे, ७) सुतार दरा- हजेरी कोठी, ८) यशवंतराव चव्हाण  नाट्यगृह, ९) लोढा पेट्रोल पंप, १०) मयुर डीपी रोड, ११) तेजस नगर ग्राऊंड, १२) कमिन्स कंपनी गेट नं. १, १३) गांधी भवन ग्राऊंड, १४) गोपीनाथ नगर


कोंढवा येवलेवाडी  क्षेत्रिय कार्यालय -


१)उत्कर्ष सोसायटी, पेशवे कात्रज तलावालगत, २) राजस सोसायटी कात्रज, अॅमिनिटी स्पेस कमला सिटी समोर, ३) कै. चिंतामणराव देशमुख उर्दू शाहा, बिबवेवाडी, ४) काकडे वस्ती, कोंढवा बु. ५) शरद पवार गार्डन हौंद, कोंढवा बु. ६) गोकुळनगर हौद कात्रज कोंढवा रोड कोंढवा बु. ७) आरोगय् कोठी, येवलेवाडी जि.प. शाळा प्र.क्र. ४१ ८) येवलेवाडी तलाव गारवा हॉटेल समोर, ९) उंड्री गाव


औंध क्षेत्रिय कार्यालय-


१)राजीव गांधी विसर्जन घाट, औंध नदीकिनार, २) मलिंग घाट, औंध नदीकिनार, ३) शांता आपटे औंध नदीकिनार ४) महादेव घाट, औंध नदीकिनार, ५) सुतारवाडी जलतरण तलाव, ६) जयभवानीनगर, ७) वाकेश्वर मंदिर, पाषाण, ८) आयटीआय मैदान पाषाण, ९) सोमेश्वर मंदिर, १०) बालेवाडी गावठाण नदीकिनार


वरीलप्रमाणे सर्व घाटांच्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे व व्यवस्था करण्यात आली आहे. हौदांची दुरुस्ती करुन त्यात स्वच्छ पाणी ठेवण्यात आले आहे. सदर घाटांवर दैनंदिन स्वच्छता, साफसफाई करण्यात येत असून निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व घाटांवर ३ पाळ्यांमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी जीवरक्षक, सुरक्षा रक्षक व अग्निशमनचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.


सांस्कृतिक केंद्र विभागाकडून यावर्षी पुणे महानगरपालिका सेवक वर्ग गणेशोत्सव समिती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत महापालिकेच्या कर्मचारी वर्गाबरोबर चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाणी या क्षेत्रातील  कार्यरत असणारे कलाकार व तंत्रज्ञ हे वादक म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास १५०-२०० सिने कलाकार पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मंडई चौक ते अलका चौक पर्यंत सफाई अभियान राबविणार आहेत.  


अग्निशमन दलाकडून गणेशोत्सव काळात करण्यात येत असलेली व्यवस्था-


गणेशोत्सवाचे काळात विविध दिवशी गणपती विसर्जन करण्यात येते, अशाप्रकारे प्रामुख्याने गणपती विसर्जन होणाऱ्या मुठा नदीकाठच्या घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने दलाचे जवान तसेच खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.


घाटांवर नेमलेल्या जीवरक्षकांना त्यांचे काम अधिक सुरक्षिततेने व कार्यक्षमतेने करता येण्याच्या उद्देशाने लाईफ जॅकेटस, लाईफ बॉय व रात्रीचे वेळेस जीवरक्षक पटकन नजरेस पडण्याच्या दृष्टीने फ्लोरोसेन्ट जॅकेटस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.


प्रत्येक घाटावर नदीकिनारी नागरिक व त्यांचे समवेत येणाऱ्या लहान मुलांनी गर्दी करु नये, म्हणून नदी किनारी आडवा दोरखंड लावण्यात आलेले आहे. तसेच काही घाटांवर नदीचे पात्रामध्ये आडवा दोर बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून प्रवाहाबरोबर वाहून गेल्यासया दोरखंडास धरुन आपला जीव वाचवू शकते. नटराज घाटावर लाईफ मास्ट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी नदीच्या पात्रामध्ये मोठा उजेड उपलब्ध करुन बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविता येणे शक्य होणार आहे.


नागरिकांना शक्यतो नदीच्या पात्रात आतपर्यंत जाऊ न देता, काठावरच गणपती विसर्जन करण्यास सांगण्यात येते. बऱ्याचदा दलाकडील जवान व भोई लोकांकडूनच गणपतींचे विसर्जन करण्यात येते.

अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व जवानांच्या सर्व प्रकारच्या रजा व आठवडा सुट्या बंद करण्यात येऊन या कालावधीत वरील १८ घाटांवर अग्निशमन दलाकडील अधिकारी स्वत: उपस्थित रहाणार आहेत.

संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत मुठा नदीकिनारीचे विसर्जन घाट वगळता शहरातील अन्य विसर्जनाच्या ठिकाणी संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडून त्यांचे स्तरावर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात येते.


पुणे अग्निशमन दलाचे विनम्र आवाहन


अग्निशमन दल आपल्या सुरक्षेसाठी कटीबध्द असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दुरध्वनी क्र. १०१ वर संपर्क साधावा

गणेश मुर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरी, तळे यापासून दूर उभे करुन त्यांचेजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे.नाव/होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नये, तसेच बसलेल्या व्यक्तींनी नाव/होडीस अपघात होईल असे वर्तन करुन नये.

पुणे मनपाच्या वतीने नदीकाठी नेमण्यात आलेल्या ‘‘जीवरक्षक सेवकांकडून शक्यतो गणेश मुर्तीचे विसर्जन करवून घ्यावे.

एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची कल्पना नदीकाठी नेमलेल्या जीवरक्षकांना तातडीने द्यावी.मद्यपान केलेल्या अवस्थेत नदीपात्र, तलाव, कॅनॉल, विहीर, तळे इत्यादींजवळ जाऊ नये.पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यासअशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरावे.अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी कृपया अधिकृत घाट, मनपाने विविध ठिकाणी बांधलेले विसर्ज़न हौद व मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांनी गणेश विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी कृपया गणेश मुर्तीचे विसर्जन करावे.

मिरवणूकीच्या मार्गावर दोन ठिकाणी अग्निशमन दलाची ‘‘बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

वरील घाटांपैंकी महत्वाच्या गणपतीचे विसर्जन होणाऱ्या व गर्दी होणाऱ्या नटराज सिनेमा मागील घाट, संगम घाट, वृध्देश्वर घाट, गरवारे कॉलेज कॉजवे येथे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ध्वनीक्षेपण यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यावरुन नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांकडून सूचना देणेची व्यवस्था करण्यात आली आहे.

कॉमनवेल्थ इमारत येथील बिनतारी संदेश मदत केंद्रात आवश्यक ते फायर एक्स्टिंग्वीशर्स व ते हाताळण्यास दलाचे सेवक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व जवानांच्या सर्व प्रकारच्या रजा व सुट्ट्या बंद करण्यात येऊन या कालावधीत वरील १५ घाटांवर अग्निशमन दलाकडील अधिकारी स्वत: उपस्थित रहाणार आहेत.


आपत्कालीन संपर्क दुरध्वनी क्रमांक

१) ०२०-२५५०/१२६९  

२) ०२०-२५५०/६८००/१/२/३ 



                                                                                योगेश हेंद्रे

                                                                             प्र. माहिती व जनसंपर्क अधिकारी

                                                                                      पुणे महानगरपालिका




Post a Comment

Previous Post Next Post