छत्रपती शिवरायांचा मालवण मधील पुतळा निकृष्टपणे उभारणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करा; "आप" ची मागणी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

आम आदमी पक्षाच्या वतीने आज नाना पेठ येथील पक्ष कार्यालयाबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता ज्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. साधारणतः अडीच ते तीन कोटी रुपये खर्चून हा पुतळा मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारला गेला होता. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाच्या दिवशी उद्घाटन करण्याच्या हेतूने अतिशय घाईगडबडीत हा पुतळा तयार केला गेला होता. पुतळा उभारताना योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याने आणि केवळ श्रेयवाद घेण्यासाठीच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातल्याने पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले गेले. महाराष्ट्राची अस्मिता आणि मानबिंदू असलेले छत्रपती शिवराय यांचा पुतळा कोसळणे ही खरंच खूप खेदजनक बाब असून, यात राज्य सरकार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने छत्रपती शिवरायां प्रती दाखवलेली अनास्था आणि श्रेयवाद घेण्यासाठी केलेली धडपडच दिसते आहे, असे यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.


भाजपा सरकारच्या काळात अनेक काम ही निकृष्ट दर्जाची होत असून याची उदाहरणे म्हणजे अनेक राज्यातील विमानतळांचे पावसात नुकसान झालेले आहे, लोकशाहीचा मानबिंदू असलेली भारतीय संसदेच्या इमारतीलाही गळती लागली, समृद्धी महामार्गावरील रस्त्यांना देखील अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आलेले आहे. केंद्र सरकारच्या वतीने जी कामे केली जात आहेत ती केवळ दिखाव्या पुरतीच करण्यात येत असून , महाराष्ट्र सरकार देखील अशाच प्रकारे दिखावा करण्याचे काम राज्यात करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारे ठेकेदार यांच्यात असणाऱ्या भ्रष्ट संबंधांमुळेच निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारला गेला, त्यामुळे या दुर्घटनेबाबतची श्वेतपत्रिका काढून पुतळा पडण्यामागची कारणे तपासली जावीत. छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबाबत पत्र लिहून केंद्र सरकारला सूचना केली होती परंतु त्याकडेही केंद्र सरकारने हेतू पुरस्सर दुर्लक्ष करून पुतळ्याचे अनावरण केले. हा सर्व प्रकार पाहता केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकारी भ्रष्टाचार यांना पाठीशी घालून निकृष्ट दर्जाची कामे जनतेच्या माती मारत असल्याचे दिसून येते त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी केली 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा अपघातामुळे पडला असे विधान राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच राजकोट किल्ल्यावर उपस्थित असताना केले. शासनाच्या प्रतिनिधीने एखाद्या चुकीला अपघात ठरवणे ही केवळ जनतेच्या डोळ्यात केलेली धुळपेक असून अशा भ्रष्ट आणि खोटे बोलणाऱ्या राजकीय नेत्यांना सत्तेत बसण्याचा कुठलाही अधिकार नाही. असे यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

या छत्रपतींच्या पुतळ्याचे ज्या मूर्तीकाराला कंत्राट मिळाले त्याचा अनुभव आणि पार्श्वभूमी पाहता हा सर्व क्रोनी कॅपिटलीझम म्हणजे कंत्राट कामातील मित्रांवरती कृपादृष्टी आणि टक्केवारी आहे असे दिसते. परंतु त्याचसोबत ' कामाच्या दर्जामध्ये तडजोड ' ही  भाजपची नवी देन आहे असे म्हणावे लागेल. 

- मुकुंद किर्दत, आप प्रवक्ते

ज्यांना राजकोट, मालवण येथील साधं स्मारक बांधता आले नाही ते अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक काय बांधणार? या भाजप सरकारने प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार केला आणि भेसळ केली आहे, त्यांनी छत्रपतींचे स्मारक सुद्धा सोडले नाही.

जे छत्रपतींचे स्मारक उत्कृष्ट बांधू शकले नाहीत, त्यांना सत्तेच राहायचं काहीही अधिकार नाही. मुख्यमंत्री यांनी ताबडतोप राजीनामा दिला पाहिजे. 

- सुदर्शन जगदाळे पुणे शहराध्यक्ष 

सोळाव्या शतकात जुलमी मुघल शाही विरुद्ध स्वराज्याची स्थापना करून त्या स्वराज्यात अनेक किल्ले बांधणाऱ्या छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे शेकडो कोटी रुपये खर्च करून केलेले स्मारक निकृष्ट दर्जामुळे कोसळले महाराष्ट्राच्या दृष्टीने हा दैव दुर्विलास आहे. महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध.    

- किरण कद्रे , प्रवक्ता  पुणे शहर

आंदोलनात आम आदमी पक्षाच्या वतीने  पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, 

संजय कोने, सागर कानगुडे, निखिल खंदारे, अविनाश भाकरे , संतोष काळे, रुबीना काझमी, संदिप सुर्यवंशी,मनोज शेट्टी,आप्पा कोंढाळकर , प्रितम कोंढाळकर ,अक्षय शिंदे ,सतीश यादव,ॲड.प्रदिप माने, सुरज सोनवणे,शेखर शिवाजी ढगे, ॲड गणेश थरकुडे, कुमार धोंगडे, संजय कटारनवरे, माधुरी गायकवाड, तहसील देसाई, सुनील सवदी, उमेश बागडे, अजीम शेख, समीर आरवडे, असगर बेग, आप्पा कोंढाळकर, सुभाष करांडे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




आम आदमी पक्ष 

मीडिया टीम

Post a Comment

Previous Post Next Post