पुण्यातील देहूरोडच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे रिक्त पदांवर भरती सुरू...

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील देहूरोडच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट आणि डेंटल सर्जन या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देहूरोड, पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 5 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

20 सप्टेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख असणार आहे. त्यासाठी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलसमोर, गुरुद्वारा, देहूरोड, पुणे-४१२१०१ येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://dehuroad.cantt.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post