३६ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये‘ आविष्कार भारती’ने प्रेक्षकांची मने जिंकली



प्रेस मीडिया लाईव्ह :

३६व्या पुणे फेस्टिवलमध्ये भारती विदयापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आविष्कार भारती या कार्यक्रमामध्ये त्यांच्या संगीत आणि नृत्य सादरीकरण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त भरघोस प्रतिसाद मिळाला. संचालक प्राध्यापक शारंगधर साठे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. 

 सुरांजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, नंदिनी गायकवाड, अंजली गायकवाड यांनी भजन, गझल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत, गवळण, संगीत असे विविध प्रकार गायले. या नंतर कथक, भरतनाट्यम आणि आसामचे सत्रिय या शास्त्रीय नृत्य शैली मधे अनेक नृत्य संरचना सादर झाल्या. यामध्ये स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या नृत्याच्या १२७ विद्यार्थिनींनी ज्या सुचेता चापेकर, मनीषा साठे, शमा भाटे, स्वाती दैठणकर, प्रेरणा देशपांडे, अरुंधती पटवर्धन, देविका बोरठाकूर, मंजिरी कारुळकर, तेजस्विनी साठे, अस्मिता ठाकूर, अमृता परांजपे या गुरूंकडे शिकत आहेत आपली कला सादर केली. या मधे अनेक देवतंवरील स्तुती परणे, त्रिवट, चतरांग, कृष्णभक्ती यावर आधारित अनेक नृत्य संरचना विलक्षण प्रभावी पणे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. नवीन पिढीतील कलाकारांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगमसंगीत आणि शास्त्रीय नृत्त्याच्या प्रस्तुती करण्याला अनेकदा वन्समोर मिळाला. संपूर्ण बालगंधर्व रंगमंदिर या वेळी भरलेले होते. सर्व नृत्य गुरू तसेच पंडित रघुनंदन खंडाळकर, पंडित अंगद गायकवाड, पंडित प्रमोद मराठे असे अनेक संगीतातील गुरू उपस्थित होते.


भारती विदयापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलसचिव जे. जयकुमार, उप कार्यवाह डॉ सगरे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक आड अभय छाजेड आदी यावेळी उपस्थित होते.


शारंगधर साठे - ९८५०८ १२५२३   

Post a Comment

Previous Post Next Post