प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात एक जण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दुचाकीवरुन आलेल्या देवीलाल शंकरलाल अहिर (वय ४२, रा. कात्रज) पोलिसांनी पकडून पोलिसांनी त्याची चौकशी केली , दुचाकीची डिक्की उघडल्यानंतर त्यात अफू सापडली. पोलिसांच्या पथकाने ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू , दुचाकी ,मोबाइल संच जप्त केला अहिरने अफू कोठून आणली, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.