प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदा सरकार उलथून टाकायचेच या हेतूनेच शरद पवार यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची अनेकांना इच्छा आहे. हे इच्छुक उमेदवार शरद पवारांची भेट घेताना दिसत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार बबन शिंदे , काँग्रेसचे नेते आबा बागुल सुरेंद्र पठार , अमित भांगरे यांनी आज पवारांची भेट घेत चर्चा केली. त्यामुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे चित्र दिसत आहे.
कोथरुड विधानसभा
कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अमोल बालवडकर यांनी 'जनसंवाद' दौऱ्यादरम्यान बालेवाडी येथील 'द पर्ल सोसायटी' मध्ये भेट दिली. यावेळी सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. दरम्यान, उपस्थित सर्वांशी संवाद साधत सोसायटीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी बालवडकर यांनी जाणून घेतल्या. तसेच आगामी काळात या समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघातून उमेदवार म्हणूनअमोल बालवडकर यांच्या नावाला पसंती असल्याची भूमिका यावेळी नागरिकांनी बोलून दाखवली.'विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा मी उमेदवार म्हणून उभा राहीन,तेव्हा आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मतरुपी स्वरूपात द्यावा अशी इच्छा व्यक्त करूनआपल्या विश्वासाला पात्र ठरेल, अशी कामगिरी करून दाखवेल', अशी ग्वाही अमोल बालवडकर यांनी दिली.