प्रेस मीडिया लाईव्ह :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेल्या राज्यातील
लोकसभा निरिक्षकांसोबत कामकाजा करीता महाराष्ट्राचे
प्रभारी मा. श्री. रमेश चेन्निथलाजी यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून
राज्यातील लोकसभा क्षेत्राकरीता मुख्य समन्वयकांची नियुक्ती करण्यात
आली आहे त्याच अनुषंगाने पुणे लोकसेभेच्या मुख्य समन्वयक
पदी माजी नगरसेवक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ
उपाध्यक्ष श्री. अजित दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदार संघात आठ विधानसभा मतदार संघाची क्षेत्र
येतात. आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या निवडणुकीसाठी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पुणे लोकसभासाठी माजी खासदार
मा. जगदीश ठाकुर यांची नेमणुक केली आहे.
या नेमणुकीनंतर श्री. अजित दरेकरांनी महाविकास आघाडीच्या आठही
विधानसभेचे उमेदवार निवडणुन आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न
करू असा विश्वास व्यक्त केला.
Tags
पुणे