प्रेस मीडिया लाईव्ह ,:
पुणे : भारतीय संस्कृतीसाठी जाज्वल्य अभिमान ठरणाऱ्या व अटके पार लौककक पोहोचलेल्या गणेशोत्सवाचा महीमा हा खरोखरच अपरंपार आहे. लोकमान्यांनी सामाजीक एकतेसाठी पुण्यात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि आजमितीला हे गणेशोत्सवाचे स्वरूप गगनाला भिडले. या गणरायासोबतच ६४ कलांचा परिस स्पर्ष ह्या शहराला होऊन पुणे विविधरंगी उत्सवांनी झगमगून गेले. अनेक कलाकार, शिक्षणतज्ञ्, समाजसेवक, शास्त्रज्ञ, खेळाडू यांनी आपापल्या कार्यामध्ये दैदीप्यमान यश संपादन करून पुण्याचे सांस्कृतिक जीवन अधिकाधीक संपन्न केले आणि पुण्याच्या गौरवशाली परंपरेत मोलाचे योगदान दिले. अशा यशवंतांच्या कार्याची दखल घेत पुण्याचा मानाचा
पहिला श्री. कसबा गणपती सार्वजनिक मंडळ दरवर्षी श्री. कसबा गणपती पुरस्कार प्रदान करते.
पहिला श्री. कसबा गणपती सार्वजनिक मंडळ दरवर्षी श्री. कसबा गणपती पुरस्कार प्रदान करते.
यावर्षी मंडळाने खाली नमूद केल्याप्रमाणे सर्व मान्यवरांना रविवार दि.०८ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ४:०० ते ६:३० वाजता हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे योजिले आहे. पुरस्कार सोहळा श्री.कसबा गणपती उत्सव मंडपात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुर्तिषास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करताना व आपल्या गुणांचा यथोचित सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
पुरस्काराचे मानकरी:
१. डॉ. श्रीकांत भास्कर केळकर, प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजीचे संस्थापक
२. वेदमूर्ती समिहन वामन कोल्हटकर. वेदाभ्यास व्यासंगी
३. सीए रचना फडके-रानडे, आर्थिक विश्लेषक
४. श्री. नचिकेत देशपांडे,
पूर्णवेळ संचालक आणि COO|
LTIMindtree५. डॉ. संजय बी चोरडिया, संस्थापक अध्यक्ष व अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
६. ॲड.भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार :- ॲड. सोहनलाल के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ
अधिक माहितीसाठी संपर्क
Tags
पुणे