प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोंढवा परिसरात तब्बल ४० लाख ४० हजारंचा मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करून कारवाई करण्यात आली असून आरोपी समीर शरीफ शेख ( 22 रा. भाग्योदयनगर , कोंढवा ) याला अटक करण्यात आली आहे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) गणेश इंगळे यांचे मागदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथलातील पोलीस निरीक्षक उल्हास कदम पथकासह कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा त्यांना शेख घरातून एम.डी. या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे अंमली पदार्थाचा साठा सापडला. त्यावरून कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, उत्तम काकडे, दयानंद तेलंगे, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख व कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी केली.