प्रेस मीडिया लाईव्ह :
मानवी विचारातून चित्रकला, शिल्पकला, संगीत साकारले जाते. पुणे फेस्टिव्हलमध्ये आकृती ग्रुपच्या महिला चित्रकारांनी ५० फुट कॅन्व्हासवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे चितारली ही कौतुकास्पद बाब आहे. कलेला राजाश्रय आणि लोकाश्रयही मिळाला पाहिजे अशे उद्गार खा. मेधा कुलकर्णी यांनी आज व्यक्त केले. ३६व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत केसरी वाडा येथील लोकमान्य सभागृह येथे ५० फुट लांब व ३ फुट रुंदीच्या कॅन्व्हासवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे चितारण्याचा अभिनव उपक्रम पार पडला. त्यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ. शमा पवार, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रमुख श्री. किरण ठाकूर, डॉ. प्रणिती टिळक, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, समन्वयक अॅड. अनुराधा भारती, प्रसन्न गोखले आदी उपस्थित होते.
पुणे फेस्टिव्हलमध्ये देशातील महिला चित्रकारांच्या आकृती ग्रुपतर्फे गेली १५ वर्षे महिला चित्रकारांचे पेंटिंग्ज प्रदर्शन भरवले जात असून यंदा पर्यटनवृद्धीसाठी ‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे’ हा विषय निवडण्यात आला. पर्यटननगरी बनलेल्या पुणे शहरात अधिकाधिक देशी-परदेशी पर्यटक यावेत व पुण्याचे ब्रँडींग जगभर व्हावे यासाठी, पुणे फेस्टिव्हलतर्फे महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या सहयोगातून हा उपक्रम राबवला गेला आहे, असे या उपक्रमाचे समन्वयक अनुराधा भारती यांनी सांगितले.
दि. १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व कलादालनात पुणे फेस्टिव्हलअंतर्गत देशातील चित्रकारांचे पेंटिंग्ज प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे’ विषयावरील ५० फूट लांबीचा हा कॅन्व्हास प्रेक्षकांसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर हे ५० फूट लांबीचे कॅन्व्हास पेंटिंग महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडे पुणे फेस्टिव्हलतर्फे भेट दिले जाईल. ३२ महिला चित्रकारांनी ५० फूट लांबीच्या कॅन्व्हासवर एकाच वेळी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे रंगवण्याचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडे नोंदवला गेला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कुलकर्णी यांनी केले.
शनिवार वाडा, अष्टविनायक, विंचुरकर वाडा, भिडे वाडा, शिवनेरी किल्ला, जेजुरी, तुळजाभवानी, मुंबई चित्रनगरी, ज्योतिबा मंदिर, भीमाशंकर, पंढरपूर, सिंधुदुर्ग किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, कास पठार, रायगड किल्ला, माथेरान, चांद बिबी महल, शिर्डी, अजंठा लेणी, एलोरा, बहिणाबाईची कुटी, श्री क्षेत्र पद्मालय, लोणार तळे, बापूंची कुटी, गीताई मंदिर, ताडोबा, एलिफंटा गुफा, त्रिमूर्ती स्टॅच्यू इत्यादी पर्यटनस्थळे महिला चित्रकारांनी साकारली .
कॅन्व्हासवर अॅक्रेलिक कलर, वॉटर कलर्स, खडू, पेन्सिल, कोळसा इत्यादी माध्यमातून पेंटिंग्ज रंगवली गेली. जेजुरीचे पेंटिंग संपूर्ण हळदीने चितारले गेले होते. यासाठी लागणारे कॅनव्हास रोल, रंग, ब्रशेस, एप्रन इत्यादी सर्व साहित्य फेविक्रील (पिडिलाईट इंडिया) पुणे शाखा यांच्याकडून उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे फेविक्रीलकडून संपूर्ण सभागृह डेकोरेशन केले गेले होते.
३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि.,भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.
अॅड. अनुराधा भारती - 9422078956
प्रवीण प्र. वाळिंबे
माध्यम समन्वयक
९८२२४५४२३४/ ७३८७००२०९७