अरविंद तायडे : सरोदे आणि वागळे यांनी राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करावा.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : असिम सरोदे यांनी राहुल गांधी यांच्या भारत सुधारला की आरक्षण रद्द करु वक्तव्याचा निषेध करावा यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन युवा आघाडी चांगलीच आक्रमक झाली. या वेळी पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी आक्रमक शैलीत ॲड. असिम सरोदे व राहुल गांधी यांच्या भुमिकेचा समाचार घेतला.
ॲड. अरविंद तायडे व प्रदेश प्रवक्ते ॲड.प्रियदर्शी तेलंग यांनी भुमिका स्पष्ट करताना म्हटले की, ॲड. असिम सरोदे यांनी निर्भय बनो या उपक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले होते. त्यामुळे ॲड. असिम सरोदे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा. राहुल गांधी यांना सत्तेत असताना भारताचा विकास व इतर मुद्दे का आठवले नाहीत ?
या आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष चैतन्य इंगळे, महासचिव जान्हवी शेलार, युवा आघाडी महासचिव शुभम चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, युवा आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष नितीन गवळी, जिल्हा पुर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे,जिल्हा पश्चिम अभिषेक वैराट , मावळ तालुका अध्यक्ष संदीप कदम, दौंड अध्यक्ष विशाल शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई चव्हाण, वसंत दादा साळवे, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, यांच्या सह अनेक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.