प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महानगरपालिकेने विकत घ्यावे यासाठी 32 गावांच्या माध्यमातून "गाव विकणे आहे" अशा प्रकारच्या जाहिराती गावोगावी लावण्यात येऊन पुणे महानगरपालिकेचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
महानगरपालिकेने कोणत्याही सुविधा न पुरवता टॅक्स ( कर ) मात्र भरमसाठ लावलेला आहे अशा पार्श्वभूमीवर "आम्ही टॅक्स भरू शकत नाही तुम्ही आमचे गावच विकत घ्या."अशी भूमिका ३२ गावातील ग्रामस्थांनी घेतलेली आहे. टॅक्स या विषयावर ३२ गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी पुढील मोठ्या आंदोलनाची तयारी होताना दिसत आहे. सध्या धायरी, नऱ्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी,खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या गावात सर्वत्र बोर्ड लागल्याचे दिसत आहेत.
Tags
पुणे